साथ तुझी

तूझ्याशी सुंदर एक नातं जुळलय,
येण्याने तुझ्या माझं जगच खुललय,
निष्पाप प्रेम तुझं सगळीकडे पसरलय,
गोड स्वभावाने तुझ्या आयुष्य बहरलय.

मनाने आपण एकमेकांना कायमचं वरलय,
दरबारात देवाच्या हे आधीच ठरलय,
तुझ्या खऱ्या प्रेमामुळे हे सगळं घडलय,
तुझ्या छान स्वभावात याचं यश दडलय. 

जेव्हा जेव्हा हे अनोखं नातं बिघडलय,
ह्रदय आपलं अगदी ओक्साबोक्शी रडलय,
एक मात्र आता मला नक्की कळलय,
तुझ्या साधेपणा मुळेच हे प्रेम फळलय. 

प्रेमळ आठवणींनी तूझ्या आयुष्य भरलय
नसली साथ तुझी तर दुसरं काय उरलय?



- सतीश सप्रे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा