- ममंसिं वार्ता -

MMS Walk

या वर्षी ९ ऑगस्टला सिंगापूरच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने देशभरात अनेक उपक्रम राबवले गेले. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरनेही ह्या निमिताने एका वॉकचे आयोजन ८ ऑगस्टच्या सकाळी केले. फोर्ट कॅनिंग पार्क येथे सकाळी ७ वाजता सिंगापूरच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाला साजेसा पांढरा आणि लाल पेहराव करून मंडळी एकत्र झाली. अध्यक्षा मंजिरी कदम यांनी फोर्टबद्दल थोडी माहिती दिली आणि ७.३० वाजता वॉकला उत्साहाने सुरुवात झाली. ८.१५ वाजता Picnic Terrace वर पोहचल्यावर ८.१५ ते ८.३० फलाहार व त्या नंतर "आपली अनमोल दृष्टी कशी जपावी" याविषयी नेत्रतज्ञ डॉ. अजीत वागळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. आजच्या तंत्रयुगात आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची त्यांनी माहिती दिली.

५५ सभासद ह्यासाठी उपस्थित होते.


- राजश्री लेले

मैफल - पंडित कैवल्यकुमार गुरव

१५ ऑगस्टच्या दुपारी ४:३० वाजता मेलविल पार्क येथे किराणा घराण्यातील एक ख्यातनाम गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती.


पं. गणपतराव गुरव (आजोबा) व पं. संगमेश्वर गुरव (वडील) यांचा वारसा पं कैवल्यकुमारजी समर्थपणे चालवत आहेत. वयाच्या ३५ व्या वर्षीच पंडितजी आकाशवाणी व दूरदर्शनचे Top Grade Artist श्रेणीचे सगळ्यात तरुण मानकरी ठरले. त्याचप्रमाणे, सूरमणी - सूरसिंगार संसद, पं. जसराज गौरव पुरस्कार, रझा फौंडेशन पुरस्कार (पॅरिस) असे अनेक मानाचे किताब त्यांना मिळाले आहेत. उपाध्यक्षा अस्मिता तडवळकर यांनी पंडितजींची ओळख करून दिली. भीमपलासी आणि श्री रागातील बंदिशी नंतर “शूरा मी वंदिले” हे नाट्यगीत आणि त्यानंतरच्या दोन अभंगांनी कार्यक्रमात अधिकच रंग भरला. संवादिनीवर रोहित मराठे तर तबल्यावर सचिन भिडे यांची समर्पक साथ त्यांना लाभली.

५७ सभासद ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित प्रेक्षकांची पसंतीची पावती ह्या कार्यक्रमाला भरभरून मिळाली.
- राजश्री लेले

आजीव सभासद सभा

२६ जुलै २०१५ रोजी आजीव सभासदांची सभा घेण्यात आली. १९ आजीव सभासद सभेला उपस्थित होते. ममंसिं अध्यक्षा मंजिरी कदम यांनी सभासदांचे स्वागत केले आणि सभेची रूपरेषा मांडली. कार्यवाह विशाल पेंढारकर यांनी २०१५ च्या कार्यकारिणीने केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला व आगामी कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर सभासदांची आकडेवारी मांडली. त्यानंतर भविष्यातील संभाव्य उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.
- अस्मिता तडवळकर


आगामी कार्यक्रम

  • सप्टेंबर - गणेशोत्सव
  • ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयातर्फे सूचित करण्यात आलेल्या "दूरदेशीही नांदे, माझी मराठी आनंदे" ह्या उपक्रमा अंतर्गत स्पर्धा
  • नोव्हेंबर - बालनाट्य व स्थानिक कलाकारांचं नाटक








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा