फिटनेसची मॉडर्न गुरुकिल्ली

MODERN गुरुकिल्ली असे शीर्षक वाचूनहे काहीतरीमॉडर्नप्रकरण असेल, असे वाचकांना वाटणे सहाजिक आहे. पण हे पुढील शब्दांनी मिळून बनलेले Acronym  आहे :

Moderation; Organization; Discipline; Engagement; Regularity; Non-addiction

ही सहा तत्त्वे पाळल्याने सदोदित आपली प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. आधुनिक (“Modern”!) जीवनशैलीच्या दुष्परिणामांशी दोन हात करण्याची कुवत MODERN मध्ये आहेहे नुसते व्यायामाचे तंत्र किंवा आहाराच्या बाबतीतले तंत्र असे एकांगी नसून ही एक संपूर्ण जीवनशैली आहे. MODERN ह्या acronym च्या द्वारे ही मूलतत्त्वे लक्षात राहण्यास सोपे होईल अशी अपेक्षा आहे.

Moderation: सुवर्णमध्य !! अतिरेक नसण्याची स्थिती. प्रत्येक बाबतीत Moderation गरजेचे आहे. उदा. व्यायाम किती करावा ? आहार किती घ्यावा ? किती वेळा घ्यावा ? ब्राऊझिंग किती करावे ? झोप किती घ्यावी ? इतकेच नव्हे तर महत्त्वाकांक्षा किती बाळगावी ? बोलावे किती ? प्रत्येक ठिकाणी संयम आणि प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. हे न पाळल्यास नुकसान होते.

अती व्यायामाने गंभीर स्वरूपाचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. अती झोप किंवा हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात दिसून येणारी गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा कमी झोपह्याचेही दुष्परिणाम होतात. ब्राऊझिंग अती केल्यास मन:शांतीवर निश्चितच परिणाम होतो. त्याची परिणती प्रकृती बिघडण्यात होऊ शकते. Moderation हा फिट्नेसचा गाभा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही!

Organization: शक्यतो कुठल्याही कामाचे, मग ते फिटनेससाठी असो, किंवा इतर काही, आधीपासून थोडे का होईना, “प्लॅनिंगकेलेले असणे, पूर्वतयारी केलेली असणे गरजेचे आहे. म्हणजे आयत्या वेळी काही तरी विघ्न येण्याची, शेवटच्या क्षणी धावपळ होण्याची शक्यता कमी होऊन ताण-तणाव (stress) कमी होतो. Stress हे बव्हंशी दीर्घकालीन व्याधींचे कारण आहे ह्यात दुमत नाही. व्यायाम करतानाही Organization म्हणजे काय, तर काय व्यायाम करायचा, त्याचा आराखडा तयार असावा. योगासने करीत असल्यास, कोणती आसने, त्यांचा क्रम, त्यापूर्वी warm-up, व्यायाम झाल्यावर शवासन किंवा relaxation अशा प्रकारचा ठराविक, संतुलित प्लॅन असावा.

Discipline: शिस्तशीरपणा शिवाय फिट्नेस् अशक्य आहे. कुठल्याही बाबतीत, विशेषत: फिट्नेस च्या बाबतीत, शॉर्ट कट नाही.  “पी हळद, हो गोरीहे शक्य नाही, म्हणूनच तीम्हणआहेउदा. काही नवीन व्यायामप्रकार सुरू केल्यास झेपेल अशालेव्हलपासून सुरू करून पद्धतशीरपणे वाढवत न्यावा. Moderation पाळून थांबवावा. दुसरा शिस्तीचा भाग असा, की जी गोष्ट जशी करणे बरोबर आहे, तशीच ती केली तर त्याचा फायदा होतो. कुठल्याही व्यायामाच्या बाबतीत हे खरे आहे, आणि इतरही बाबतींतव्यायामतो कुठलाही असोझाल्यावर शवासन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “वेळ नाहीकिंवा काहीही सबबीमुळे  हा नियम न पाळणे हानिकारक आहे.

Engagement: याचा अर्थ आपण जे काम करीत आहोत त्यात आपले मन पूर्णपणे समरस असणे. Full engagement of the mind with the activity being performed.  योगशास्त्रामध्येप्रज्ञापराधअशी संज्ञा आहेम्हणजे मन आणि क्रिया यांच्यात फारकत येणे, आपण करीत असलेल्या गोष्टीशी मन एकरूप नसणे. प्रज्ञापराध घडल्याने व्याधीचे बीज पेरले जाते. एकमेकांशी गप्पा मारतजॉगिंगकरणारी मंडळी बर्याचदा दिसतात. ह्यामध्ये केवळ प्रज्ञापराधच घडत नाही, तर जॉगिंग चे चुकीचे तंत्र नकळत अवलंबले जाते. मनाचाफोकसहटल्यामुळे धावताना श्वसनाची लय बिघडते. बोलल्यामुळे तोंड उघडे ठेवून श्वास घेतला जातो. एकंदरीतच हा प्रकार counter-productive ठरतो. टीव्ही बघत व्यायाम करणार्यांचीही हीच कथा.
जेवताना सुद्धा आपल्या मनाची Engagement जरूरी आहे. जेवणाचा आस्वाद न घेता टीव्ही बघत, पुस्तक किंवा काहीतरी गॅजेट वाचत, लॅप् टॉप वर email reply करत जेवलेले पचनासाठी, आणि पर्यायाने फिट्नेससाठी चांगले नाही, हे आपणा सर्वांना माहीत आहेच.

Regularity: फिट्नेससाठी आपण जे काही करू, त्यामध्ये नियमितपणा, सातत्य असणे अत्यंत आवश्यक आहे. धरसोड करण्याने काहीही साध्य होत नाही. आपण एक ठराविक व्यायाम करण्याचा नियम स्वत:साठी लावून घेतल्यावर आठवड्यातून चार ते सहा वेळा तो केला पाहिजे. जो व्यायाम ठरवू, तो साधा सरळ असावा (Moderation principle!!), झेपेल इतकाच असावा. पण नियमित केला जावा. प्रचंड फायदा होतो. दुसरी गोष्ट अशी, की, ठराविक व्यायाम नियमितपणे दीर्घकाळ केल्याने त्यामध्ये कौशल्य वाढते, आणि त्याचा प्रकृतीला फायदा होतो. उदा. योगासने करत असल्यास, साधी, सोपी, आपल्याला सहज जमतील अशी, पण तीच आसने दर वेळी केली, तर ती अधिकाधिक चांगल्या प्रकारे करता येऊ लागतात, आणि त्याचे ठराविक फायदे चांगल्या प्रकारे होतात. दर वेळी आसने बदलल्यास कशावरच mastery न आल्याने काहीच निष्पन्न होत नाही.

फार कठीण नाही आणि फार सोपा / कमी नाही (Moderate) असा व्यायाम, आठवड्यातून चार ते सहा वेळा (Regular) करणे सर्वात चांगले.
Non-addiction: कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाणे फिट्नेस आणि एकंदरीतच तब्येतीला हानिकारक असल्याचे आपण जाणतोच, पण एवढ्यापुरतेच हे तत्त्व मर्यादित नाहीNon-attachment असाही अर्थ अभिप्रेत आहे. व्यासंग आणि व्यसन ह्यातील सीमारेखा न ओलांडण्याचे भान असणे जरुरी आहे. मग ते कुठल्याही बाबतीत असो.


ही सहा तत्त्वे एकमेकांशी निगडित आहेत. उदा. Moderation आणि Non-addiction; किंवा Discipline आणि Regularity  ह्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. वर नमूद केल्याप्रमाणे ही सहाही तत्त्वे मिळून परिपूर्ण जीवनशैली बनते. ह्यातील एका पैलूचा अवलंब करून इतर पैलू हळूहळू आपोआप अंगवळणी पडतात. ही एक साधना आहे. मुलांनी लहानपणापासून ह्या प्रकारच्या सवयी लावून घेतल्यास मोठेपणी विशेष काहीतरीप्रॉजेक्टकरण्याची वेळ येत नाही. फिट्नेस कमावून तो वर्षानुवर्षे, दशकानुदशके टिकवून धरण्यासाठी आपण ह्यापैकी एक-दोन पैलूंवर काम सुरू करून सुरुवात तर करून पाहूया! इतर पैलू आपोआप पडत जातील!  

- प्रद्युम्न महाजन

                                                                                                                                     







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा