स्वातंत्र्याचे बदलते फॅब्रिक!

येत्या ऑगस्ट महिन्यात सिंगापूर आणि भारत यांचे स्वतंत्रतादिवस आहेत. तर या प्रसंगी थोडा खोल विचार मी पण केला, स्त्री किंवा व्यक्तिस्वातंत्र्य ह्या विषयावर!

स्वातंत्र्याची व्याख्या ही स्वतंत्र्यापूर्वीच्या काळी नक्कीच वेगळी होती. आज आधुनिकीकरण झालेल्या समाजात ह्या संकल्पनेत खरंच आमूलाग्र बदल झाला आहे.

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!", असं त्यावेळी नुसते लोकमान्यच गरजले होते, पण आज जो तो गरजत आहे त्यांना हव्या असणाऱ्या अधिकारांकरिता, त्यामुळेच जरा गोंधळ वाढला आहे.

स्त्रिया ह्या स्वतःच्या इच्छा आणि अधिकारांबद्दल जागरूक होऊ पहात आहेत. 

वाढत्या अपेक्षा, अन् मग त्याकरिता घेतलेले भक्कम कर्ज, त्याचे हफ्ते व “मला स्वतःचे वेगळे अस्तित्व हवे”, अशा अनेक कारणांसाठी बायका नोकरी करतात. ह्या स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे जशा स्त्रिया फक्त मेंदूने निर्णय घेत आहेत तसेच पुरुषही अती विचार करून निर्णय घेऊ पाहत आहेत. 

त्यामुळे विवाह संस्थेत "लग्न" ह्या सारख्या नाजूक नात्यात, ज्यात ह्रदय जुळते असे म्हणतात, तिथे प्रथम भेटीतच लग्नापूर्वी वर/वधू आपापले पगार, एकमेकांचे बँक balances, financial investments, जुळवत, स्वतःचे खुंटे बळकट करून मगच बोहल्यावर चढतात. अर्थातच त्याने पुढील जीवनात त्रास न व्हावा ह्याकरिता घेतलेल्या पूर्व काळज्या आहेत ह्या. पण फक्त त्रास असा की ह्या सर्व process मध्ये अविश्वास हा नाते जुळायच्या पूर्वीच नात्यात शिरतो. काहीसा prenuptial knot sign केल्यासारखा करार वाटत असल्यामुळे सप्तपदीची पावले ती फक्त लग्नाच्या मांडवातच फोटो पुरती चाललेली वाटतात. मात्र, त्यानंतर सहजीवनाची वाटचाल वेगळ्या स्वतंत्र वाटांनी चालते. Precautionary measures म्हणून स्वतःचे वेग-वेगळे बँक अकाऊंट्स ठेऊन त्यातच आपला पगार ठेवण्याच्या चर्चा अगदी पहिल्या भेटीतच दोघेही पक्ष करताना दिसतात. तसेच दोघांची नौकरी smooth पणे व्हावी ह्याकरता भविष्यात वाढत्या संसारात, मुले, घर, घरकामे सुरळीतपणे व्हावी (तेही डे केयर वा महागड्या live-in helpers शिवाय, विनामूल्य), ह्यासाठी आई वा सासूची नेमणूक पाळी पाळी ने कशी काय लावावी, व्हिजे वाढवून तेसुद्धा त्यांचा insurance वगळून) ह्यावर डोके लढवले जाते. 

तसे सासू किंवा आई करवी तोंडी सगळीच वदवणूक करून घेऊनच मग पुढे लग्नाचा काय तो निर्णय घेतला जातो. अर्थातच आई/सासू ह्यांची घरात कायमची नेमणूक केल्याशिवाय दोघांची नोकरी शक्य होत नाही पण मग ह्या सर्वांमुळे सिद्ध होते ते गृहिणींचे स्थान! मग गृहिणीने घराला दिलेले भक्कम शारीरिक सहाय्य कुठेतरी पटतेच न? मागे राहून ही घरातील अर्थव्यवस्थेला त्यांची होणारी अप्रत्यक्ष मदत नाकारता येण्यासारखी नसतानाही मग का बरे काही जणं स्वातंत्र्याचा मक्ता स्वतःचकडे ठेऊन त्यावर दुटप्पी स्पष्टिकरण देतात? ते म्हणजे, सांसारिक जबाबदाऱ्यांमध्ये, आर्थिक रुपाने बरोबरीचा वाटा उचलणाऱ्यांनाच आयुष्यातील सगळे अहम आर्थिक निर्णय घेण्याची स्वतंत्रता असली पाहिजे म्हणून? गृहिणी, ज्यांच्या सहयोगाशिवाय घर विस्कळीत होते, त्यांना मात्र स्वतंत्रतेनं काही निर्णय घेण्यास बंदी असते, ती का बरं? हेच एक ते समीकरण डोक्यात रुजत नाही कारण व्यक्तीस्वातंत्र्य मग ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे नाही का?

मी स्वतः रसायनशास्त्र सारख्या किचकट विषयात शिक्षण घेतलेली स्त्री असूनही मला सारखा प्रश्न पडतो तो हा की "स्वप्नात रंगले मी चित्रात दंगले मी" असले भावगीत पहिल्या भेटीत, मनं जुळल्यावर, गायचे दिवस कालबाह्य झालेत की काय? 

Anyway, जग हे कुण्या एकाच्या मताने चालत नसते म्हणूनच माझा विचार किंवा मत, हेच योग्य असे माझे म्हणणे नाही, पक्ष/विपक्ष हाही माझा मुद्दा नाही त्यामुळे मी फक्त चर्चाच करतेय ती बदललेल्या स्वातंत्र्याच्या संकल्पना, अन् त्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंवर. जग आणि जगातील व्यवहार हे जगातील निरनिराळया विचारांच्या लोकांमुळे चालत आले आहेत. आपला विचार इतर विचारांपैकीचा एक विचार असतो, हेच मी मान्य करते तसे तर डोक्याने विचार करणारी माणसे, ह्रदयाने विचार करणाऱ्या माणसांना वापरत डावपेच खेळत अनादिकाळापासूनच आपली बाजी जिंकत आली आहेत पण आता मात्र जन जागृती मुळे, ठार वेडेही जरा शहाणेच भासतात 😎

काही वर्षांपूर्वी मी ‘अनकही’ म्हणून खूप जुना हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यात दीप्ती नवल ही लहान शहरात वाढलेली मुलगी असते जिचे लग्न महानगरात वाढलेल्या अमोल पालेकर सोबत जमते. तर तिचं वागणं बोलणं तिचं भाव विश्व काहीसं भावूक आणि स्वप्नील असतं आणि फक्त म्हणूनच तिला सिनेमात "वेडी"😢 दाखवले आहे. वेडेपणाची ही कसली परिभाषा? कारण ती शहरातल्या मुलींसारखी हिशोबी दृष्टिकोन ठेवत नाही, स्वप्नाळू जगात वावरते, नात्यांवर विश्वास सोपवते, लग्न /जोडीदार ह्याला business contract म्हणून पाहता येणे तिच्या सारख्या ह्रदयाने विचार करणाऱ्या मुलीला शक्य होत नाही, फक्त म्हणूनच ती वेडी? मला मात्र दीप्ती नवलच्या भूमिकेत एका स्वप्नाळू नवरीचे प्रतिबिंब दिसले.

असो, आज "स्वराज्य" स्थापन करायची गरज देशास नाही तरीही अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य आपण सर्वांनाच आपला जन्मसिद्ध अधिकार वाटतो, उदा. एअरपोर्टवर /रेल्वेस्थानकांवर फ्री वायफाय मिळावा किंवा तसेच social media सारख्या ऑनलाइन मासिकात आता जसे मी आपले विचार मांडत आहे तसले मौलिक स्वातंत्र्य हे प्रत्येक स्त्रीसाठी हवेत. आता काही व्यक्ती अपवाद असतात, त्यांना फारसे वैचारिक स्वातंत्र्य किंवा कुठलेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवेच असे वाटतच नाही. तो एकेकाचा आपला स्वभाव धर्म असू शकतो, किंवा काही व्यक्ती सुरुवातीपासून दाबल्याच जातात, त्यामुळेही मग पुढे देऊ केले तरी ते स्वातंत्र्य त्यांना नको असते. 

आज मी माझ्या teenager मुलांना पाहते तेव्हा जाणवते की आजच्या teenagers चे स्वतंत्र असे विचार आहेत. त्यांना स्वातंत्र्य हवे ते हवा  तोच course सिलेक्ट करण्याचे! कुठले करियर निवडावे हा निर्णय आता पूर्वीसारखा सार्वजनिक राहिला नसून तो सर्वस्वी त्यांचे तेच ठरवतात. कधी कधी तर आजच्या teens च्या विचारातील analytical, logical clarity पाहूनही असे वाटते की आज wisdom tooth यायच्या पूर्वीच ते बऱ्यापैकी सजग झालेत आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल. 

राजकारणी दालनातही, आपला राष्ट्र नेता कोण व्हावा हे पूर्वी जनतेने कधीच इतक्या clear डोक्याने ठरवले नाही. स्वातंत्र्य देशाला मिळालेले असतानाही स्वतंत्रपणे आपल्या अधिकारांची जाणीव नसल्याने कित्येक वर्षे अयोग्य व्यक्ती सत्तेत राहिलेत 

पण आज भारताच्या लोकशाहीत प्रथमच, क्रांतिकारी असे राजनैतिक बदल घडवून नरेंद्र मोदी ह्यांना पंतप्रधान, तसेच मंत्रिमंडळातही सर्वच योग्य राजकारणी नेते निवडून, आपल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे उदाहरण भारतातील सजग जनतेने दिलेले आहे, ते जन जागृती मुळेच!. 

व्यावसायिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र तेही आज आपल्याला हवे, त्याच सोबत परदेशात काम करता यावं याचं ही स्वातंत्र्य हवं, तर एकूण म्हणजे स्वातंत्र्याचे वारे हे आता सर्वांनाच हवेसे वाटतात. मी मान्य करते, स्वातंत्र्य हे आम्हा सर्वांनाच हवे, वाढत्या अपेक्षांमुळे socio economic setup ही दिवसेंदिवस बदलत आहेत, ह्या विषयाने, माझ्या मनात जेवढी खळबळ माजवली तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याही मनात येत तर असतीलच ना? स्वातंत्र्याच्या बदललेल्या संकल्पनांनी नक्कीच समाजाचे social fabric पार बदलून टाकले आहे.

तर मग प्रश्न फक्त एवढाच की, आपण गृहीत धरलेलं किंवा आपल्याला अपेक्षित असलेलं स्वप्न किंवा स्वातंत्र्य आपल्याला टिकवता येईल का? की काही बाबतीत स्वातंत्र्याचा अतिरेक थोडा जास्तीच झाला, असे म्हणायची वेळ येईल? स्वातंत्र्याचा हा अतिरेक, समाजात समतोल ठेवेल की त्यामुळे सामाजिक ढाचा कोसळेल? प्रश्न अनेक, तसेच उत्तरेही अनेक ! निश्चितच हे सर्व प्रश्न विचाराधीन आहेत. आपण सर्व ह्या सर्वांवर विचार नक्कीच कराल असा मला विश्वास आहे.

- रुपाली मनीष पाठक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा